|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘एअर एशिया’कडून 99 रुपयांत विमानप्रवास

‘एअर एशिया’कडून 99 रुपयांत विमानप्रवास 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एअर एशिया इंडिया या कंपनीने केवळ 99 रुपयात हवाई सेवा देण्याची घोषणा केली. पुणे, बेंगळूर, नवी दिल्ली, हैदराबाद, कोची, कोलकाता आणि रांची या सात शहरात ही तिकीट नोंदणी 99 रुपयांच्या पायाभूत किमतीवर सुरू केली. कंपनीच्या संकेतस्थळावर 21 जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास 31 जुलैपर्यंत प्रवास करता येईल. भारतात सेवा सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीकडून ही खास ऑफर सुरू करण्यात आली. जीएसटी, विमानतळ कर आणि अन्य कर यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त ऑकलँड, बाली, बँकॉक, मेलबोर्न, सिंगापूर, सिडनी या आंतरराष्ट्रीय शहरांत केवळ 1,499 रुपयांत प्रवास करता येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. सध्या देशातील 16 प्रमुख शहरांत सेवा देणाऱया या कंपनीमध्ये टाटा सन्सचा 51 टक्के आणि मलेशियाच्या एअरएशिया बरहादचा 49 टक्के हिस्सा आहे.