|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » ‘मोजो बिस्ट्रो’चे मालक युग तुलीला अखेर अटक

‘मोजो बिस्ट्रो’चे मालक युग तुलीला अखेर अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन रेस्तराँना 29 डिसेंबरच्या रात्री भीषण आग लागली. या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला. याच अग्नितांडव प्रकरणी मोजो बिस्टोचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यापासून युग तुली फरार होता. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणातली ही पाचवी अटक आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील टेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत 11 तरुणींसह 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच ‘वन अबव्ह’चे मालक अभिजित मानकर, कृपेश संघवी व जिगर संघवी यांना आश्रय दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या विशाल करियाची भोईवाडा दंडाधिका-यांनी जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

 

Related posts: