|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाटलीबंद पाण्याच्या अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करा

बाटलीबंद पाण्याच्या अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करा 

प्रतिनिधी / कोल्हापूर :

शहरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मोठा आहे. पण बाटलीबंद पाण्याचे अनेक प्रकल्प अनधिकृत असून लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. अशा अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करावी अन्यथा अन्न व औषध प्रशासन कार्यालय बेमुदत बंद पाडू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

आरोग्यासाठी नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला महत्व दिले जात आहे. यामुळे बाटलीबंद पाण्याचे शहरात अनेक प्रकल्प सुरु झाले आहेत. या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. पण अनेक प्रकल्प अनधिकृत असून मिनरल वॉटरच्या नावाखाली बोअरचे पाणी बाटलीबंद करुन त्याची विक्री करण्यात येत आहे. यामुळे ही लोकांची फसवणूक आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांने गुरुवारी अन्नसुरक्षा अधिकारी ए.जे.टोणपे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बाटलीबंद पाण्याच्या अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करावी अन्यथा अन्न व औषध प्रशासन कार्यालय बेमुदत बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. यावे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, दिलीप जाधव, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, दत्ता टिपुगडे, किरण माने, गणी कडोली यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Related posts: