|Friday, August 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सातबारा मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक हैराण

सातबारा मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक हैराण 

नेटवर्कींग नसल्याने कामकाज मंद गतीने

तलाठीवर्गाकडून सहकार्य मिळत नसल्याच्याही तक्रारी

सातबारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी

प्रतिनिधी /रत्नागिरी

गेल्या 15 पेक्षा जास्त दिवस सातबारा उतारे न मिळण्याने आज तालुक्यातील अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी तालुका सातबारा संगणकीय कक्षाकडून नेटवर्कींग मंद गतीने असल्याने कामकाज होण्यास विलंब होत असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. शुक्रवारी या ठिकाणी शेकडो नागरिकांनी सातबारासाठी गर्दी केली होती. वारंवार सातबारासाठी फेऱया माराव्या लागत असल्याने याकडे जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

8 दिवसाच्या आत पूर्वी सातबारा मिळत होते. तलाठी गावातील कार्यालयातच सातबारा देत होते. आता 15 दिवस उलटून गेले तरी दाखले मिळत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ापासून नेटवर्कींग नसल्याने काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे संबंधित दाखल्यांसाठी आज नागरिकांना बोलावण्यात आले होते. मात्र आजही बऱयाचजणांना सातबारा दाखले मिळाले नाहीत. तासन्तास नागरिक ताटकळत होते. मात्र मुळातच नेटवर्क नसल्याने संगणकाचे काम होत नसल्याचे तलाठय़ांनी सांगितले. सुरळीत नेटवर्क नसेल तर दाखले कधी मिळणार? त्यासाठी पर्यायी दुसरी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करणे आवश्यक असताना ते करण्यात आलेले नाही. उलट या ठिकाणी वारंवार फेऱया माराव्या लागतात. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. शुक्रवारी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही दाखल्यांची पूर्तता करण्यात आली नाही. …

Related posts: