|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवोदितांना चित्रपटाचे मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच

नवोदितांना चित्रपटाचे मूलभूत प्रशिक्षण आवश्यकच 

प्रतिनिधी, मुंबई

आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला चित्रपटांची आवड आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱया प्रत्येक कलाकार, दिग्दर्शकाला चित्रपटाच्या मूलभूत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी व्यक्त केले. 8 व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात रमेश सिप्पी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक आणि महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, शरद काळे, हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

जर चित्रपटांचे मूलभूत प्रशिक्षण असेल तर आपला प्रेक्षकवर्ग कोणता आहे, त्याला कोणती गोष्ट सांगायची आहे, ती कशाप्रकारे मांडायची, याचे पूर्ण ज्ञान मिळते. शोले चित्रपटाबद्दल अनेक आठवणी असून माझ्या नव्या पुस्तकामध्ये त्या मांडल्या आहेत. लवकरच हे नवे पुस्तक प्रकाशित होईल, असे रमेश सिप्पी यांनी सांगितले. जब्बार पटेल यांनी या महोत्सवाबद्दल विस्तृत माहिती दिली. 19 ते 25 जानेवारीदरम्यान हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या महोत्सवात जगभरातील 91 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली अशा देशांमधील चित्रपटांचा समावेश आहे. ‘जॅम’ या फ्रेंच चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. तसेच, भारतीय चित्रपट विभागात बिसोर्जन, ज्युझ, क्लिंट आणि टेक ऑफ हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर मराठी चित्रपट विभागात मुरांबा, झिपऱया, पिंपळ या चित्रपटांचे विशेष आकर्षण असणार आहे.

Related posts: