|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातच्या मल्टिफेक्समध्ये दाखविला जाणार नाही ‘पद्मावत’

गुजरातच्या मल्टिफेक्समध्ये दाखविला जाणार नाही ‘पद्मावत’ 

  वृत्तसंस्था/ अहमदाबाद

देशभरात पद्मावत चित्रपटावरून निर्माण झालेला वाद आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारे बंदी हटविण्याच्या आदेशानंतर गुजरातमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गुजरातमधील मल्टिप्लेक्स संचालकांनी राज्याच्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची घोषणा केली.

राज्या मल्टीप्लेक्स संचलकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती गुजरात मल्टीप्लेक्स असोसिएशनचे संचालक राकेश पटेल यांनी दिली। चित्रपटावरून लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या संतापामुळे कोणतेही नुकसान आम्ही सहन करू शकत नाही असे ते म्हणाले. गुजरातमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास तो केवळ  एकपडदा चित्रपटगृहांमध्ये दाखविला जाऊ शकतो. 

राजपूतांचा विरोध

करणी सेना आणि अनेक राजपूत संघटना ‘पद्मावत’ चित्रपटावर पूर्ण देशात बंदी घालण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी सेन्सॉर मंडळ अध्यक्ष प्रसून जोशी यांना देखील धमकाविण्यात आले आहे. राजपूत संघटना चित्रपट प्रदर्शित झाल्यास हिंसक निदर्शने करण्याचा इशारा देत
आहेत.

बंदी हटल्याने भाजपशासित राज्ये नाराज

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजस्थान आणि गुजरातच्या गृहमंत्र्यांनी या आदेशाच्या विरोधात दाद मागण्यासाठी मार्ग शोधत असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागणार असल्याची माहिती हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी दिली. मध्यप्रदेशचे गृह मंत्री भूपेंद्र सिंग यांनी या चित्रपटाचे गाणे लावणे टाळले जावे अशी सूचना लोकांना केली. भाजपची सत्ता असणाऱया गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशने अधिकृतपणे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घातली होती.

Related posts: