|Saturday, May 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » हज अनुदान बंदीवर राज यांचे व्यंगचित्रातून भाष्य

हज अनुदान बंदीवर राज यांचे व्यंगचित्रातून भाष्य 

प्रतिनिधी, मुंबई

हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. ‘अनुदान आणि राष्ट्रधर्म’ या शीर्षकखालील व्यंगचित्र शनिवारी मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर टाकण्यात आले. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हज यात्रा अनुदानाची रक्कम काढून घेताना दाखवले आहेत. त्याचवेळी व्यंगचित्रात बांगलादेश आणि पाकिस्तानातून भारतात आलेले घुसखोर दाखवण्यात आले आहेत. या घुसखोरांना हाकला, असे आवाहन ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केले आहे.

Related posts: