|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबई मॅरेथॉनसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई मॅरेथॉनसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी संपूर्ण मुंबईकर सज्ज झाले असतानाच, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच मुंबई पोलीस रस्त्यावर उतरणार असून ज्या रस्त्यावरून ही मॅरेथॉन पार पडणार आहे तेथे चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मॅरेथॉनसाठी मुंबईत अनेक परदेशी धावपटूंनी हजेरी लावली आहे. त्यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे तसेच देशातील धावपटू देखील हजर झाले आहेत. सीएसटीएम ते वांदे-वरळी सीलिंक पर्यंत फूल मॅरेथॉन राहणार आहे. यासाठी 4 हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांचा लवाजमा बंदोबस्ताला सज्ज झाला आहे. परदेशी खेळाडूंच्या संरक्षणासाठी पोलिसांनी खास पथके सज्ज केली आहेत. अशावेळी दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, मध्य मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पश्चिम उपनगरातील अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या निदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाहतुकीत बदल, वाहतूक पोलीस सज्ज

दरम्यान, दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर बदल करण्यात आले आहेत. अशावेळी वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या निदर्शनाखाली प्रत्येक 200 मीटरवर वाहतूक पोलीस सज्ज राहणार आहेत. त्याचप्रमाणे राज्य राखीव दलाची पथके सज्ज झाली असून, श्वानपथक आणि बॉम्बनाशक पथकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Related posts: