|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्ट ; 20 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्ट ; 20 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले 

ऑनलाईन टीम / श्रीनगर  :

जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी जवानांकडून अलिकडच्या काळात सातत्याने होत असलेल्या गोळीबाराला लक्षात घेता सीमा परिसरातील 300 शाळा पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सुमारे 20 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानी सैन्याकडून रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार सुरू आहे, मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाक सैन्यांनी जम्मू विभागातील पाच जिलह्यांतील सीमेलगतच्या गावांना टार्गेट केले. गोळीबार, ग्रेनाईड आणि उखळी तोफांमधून हल्ले केले जात आहेत. शनिवारी सकाळी पूंछमधील कृष्णा घाटी क्षेत्राजवळ पाकने गोळीबार सुरू केला. सव्वाआठच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात लष्करी शिपाई मनदीप सिंग (23) जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याशिवाय जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आर. एस. पुरा क्षेत्र व अब्दुलियन या भागात एक 17 वर्षीय मुलगा व 45वर्षीय व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला सहा नागरिक जखमी झाले. ही बाब लक्षात घेता भारतीय जवानांनी रेड अलर्ट जारी केले आहे.

 

Related posts: