|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » निफ्टी, सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकावर

निफ्टी, सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकावर 

बीएसईचा सेन्सेक्स 342, एनएसईचा निफ्टी 117 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

बाजाराकडून नवीन विक्रमी पातळी गाठण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी निफ्टी आणि सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. निफ्टी पहिल्यांदाच 11,000 चा आकडा पार करत वर बंद झाला. सेन्सेक्सनेही विक्रमी 36,000 चा टप्पा पार केला. बँक निफ्टीही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टी 11,092 आणि सेन्सेक्सने 36,170 या विक्रमी पातळीला गवसणी घातली होती. दिवसअखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्याने वधारत बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 342 अंशाने वधारत 36,140 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 117 अंशाच्या तेजीने 11,083 वर स्थिरावला. बँक निफ्टी 1.3 टक्क्यांनी मजबूत होत 27,391 वर या विक्रमावर बंद झाला.

मिडकॅप समभागात चांगली खरेदी दिसून आली. स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात दबाव होता. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.1 टक्क्याने वधारत 18,079 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्याने वधारत 21,732 वर स्थिरावला. बीएससईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांच्या तेजीने 19,651 वर बंद झाला.

धातू, बँकिंग, आयटी, औषध, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात खरेदी दिसून आली. निफ्टीचा धातू निर्देशांक 4.1 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 4 टक्के, आयटी निर्देशांक 1.2 टक्के, औषध निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वधारले. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 0.7 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 2 टक्क्यांनी मजबूत झाली. मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात दबाव आला होता.

दिग्गज समभागांची कामगिरी

वेदान्ता, हिंडाल्को, आयओसी, एसबीआय, टाटा स्टील, सिप्ला, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया 5.1-3 टक्क्यांनी वधारले. अंबुजा सिमेंट, आयशर मोटर्स, विप्रो, जी एन्टरटेनमेन्ट, एचपीसीएल, टाटा मोटर्स, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी बँक, टीसीएस 2.2-0.5 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात जिंदाल स्टील, बायोकॉन, हॅवेल्स इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, सेल 10.3-4.6 टक्क्यांनी वधारले. कंसाई नेरोलॅक, बेयरक्रॉप, टोरेन्ट पॉवर, अपोलो हॉस्पिटल, व्हर्लपूल 3.1-1.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात वेंकिज, डेल्टा कॉर्प, इंद्रप्रस्थ, सोम डिस्टिलिरीज, थीमिस मेडिकेयर 11.8-7.7 टक्क्यांनी वधारले. रॅलिस इंडिया, कॅन फिन होम्स, श्री अधिकारी ब्रदर्स, जीई शिपिंग, फ्युचर एन्टरप्रायजेस डीव्हीआर 7.1-4.4 टक्क्यांनी घसरले.

Related posts: