|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माऊलीच्या गजरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा

माऊलीच्या गजरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा 

प्रतिनिधी/सोलापूर

पंढरपूरला निघालेल्या माघवारी पालखीचा भव्य गोल रिंगण सोहळा माऊलीच्या गजरात मोठय़ा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये लहान मुलापासून वयोवृध्द वारकरी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.

अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर यांच्यावतीने पालखी सोहळ्याचे नियोजन पार्क मैदानावर 4.30 वाजता करण्यात आले होते. अश्वाचे पूजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधिक्ष वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, नगरसेवक, आनंद चंदनशिवे, दिनकर देश्मुख, नगरसेवक विनोद भोसले, वैभव हत्तुरे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, राजू राठी, श्रीकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन वारकरी फ्ढडकरी संघटनेचे उपाध्यक्ष ह. भ. प. भागवत महाराज चवरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यामध्ये 43 दिंडय़ा व परिसरातील 55 दिंडय़ाच्या उप†िस्थतीमध्ये  वारकरी नित्यनेमाने भजन ह. भ. प. बडोपंत कुलकर्णी यांच्या मागदर्शनाने सुरू झाली. या माऊली सोहळ्याच्या रिंगण सोहळ्यात अबाल बालक, महिला, वयोवृध्दापासून तरूणांची प्रमुख उप†िस्थती होती. यावेळी पताका घेवून 100 वारकरी रिंगण सोहळ्यास दोन फ्sढऱया घातल्या. त्यानंतर टाळधारी पुरूष व महिलाची फ्sढरी, पकवाज धारक सुमारे 100 ते 150 वारकऱयांनी 2 फ्ढsऱया घातल्या. या रिंगण सोहळ्यात 3 अश्वाचा समावेश होता. त्यामधील 2 सोलापूरचे व एक आळंदीचे 1 अश्व होता.

अश्वाचे रिंगण सोहळा सुरू होताच वारकरी मंडळाने ज्ञानोबा तुकाराम महाराज की जय, श्री पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष वारकरी करत होते. तसेच माऊलीमय वातावरणातील भाविकांचा उत्साह व्दिगणीत झाला होता. प्रत्येकांच्या चेहऱयावरून आनंद ओसंडत होता. हा आनंद व उत्साह घेवून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.

 सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव बळीराम जांभळे, संजय पवार, विष्णू लिंबोळे, हरिहर मोरे, विश्वास गायकवाड, संजय पाटील, मोहन शेळके, भगवान पाटील, विजय गाडे यांनी परिश्रम घेतले.

Related posts: