|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भीषण अपघातात तीन ठार

भीषण अपघातात तीन ठार 

दाभोळे घाटात कंटेनरने दुचाकीस्वारांना उडविले,

चाफवलीतील दोन युवक ठार,

कंटेनर झाडावर आदळून चालकाचाही मृत्यू

प्रतिनिधी /देवरुख

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे घाटात ओव्हरटेकच्या नादात कंटेनरने समोरून येणाऱया दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने नियंत्रण गमावलेला हा कंटनेनर झाडावर आदळून पटली झाल्याने यात कंटेनरच चालकाचाही मृत्यू झाला. गुरुवारी सायं. 5.30 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघात चाफवली येथील चंद्रकांत बाळू रावण (45) व सुरेश सिताराम रावण (29) यांच्यासह कंटेनर चालक (नाव समजू शकले नाही) अशा तिघांना प्राण गमवावे लागले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीतून कोल्हापूरच्या दिशेने सिमेंटची पावडर घेवून कंटेनर निघाला होता. तो दाभोळे घाटात आला एका गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरून येणाऱया दुचाकीला जोरदार धडक दिला. ही धडक इतकी भीषण होती की, साखरप्यातून दुचाकीवरुन चाफवली येथे घरी निघालेल्या चंद्रकांत व सुरेश यांना कंटेनरने अक्षरशः फरफटते नेले. तीव्र उतार असल्याने या कंटेनरचा वेग हा जास्त होता, त्यात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वारांना 20 ते 25 फुट फरफटत नेल्यानंतर हा कंटेनर एका झाडावर जावून आदळला व तिथेच पलटी झाला. या भीषण धडकेत सुरेश याचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकांत याचा जिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.

कंटेनर पलटी झाल्याने चालक आतमध्ये अडकला होता. सायंकाळी उशीरापर्यंत त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर दोन तासाने त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र तो पर्यंत त्याचाही मृत्यू झाला होता. रात्री उशीरा त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा आरोग्य केंद्रात आणण्यात आला. हा चालक परप्रांतीय असल्याचे समजत असून त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प होती. हा अपघात घडल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर होणाऱया अवजड वाहतुकीचा प्रश्न सध्या चिंतेचा विषय बनला आहे. गत महिन्यात शिवसेनेतर्फे या अवजड वाहनांच्या वेगाबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. आता हा अपघात झाल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे.

Related posts: