|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » leadingnews » काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट 40ठार, 100 जखमी

काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट 40ठार, 100 जखमी 

ऑनलाईन टीम / काबुल :

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एका ऍम्ब्युलन्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 40 जण ठार तर 100 हून अधिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिस चेकनाक्यावरून जात असताना एका ऑम्ब्युलन्समध्ये हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. स्फोट झालेल्या परिसरात अनेक शासकीय इमारती आणि अनेक देशांचे दूतावस असल्याने इथे भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानातील सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटातील बळींची संख्या 40 इतकी असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गेल्याच आठवडय़ात हॉटेल इंटरकॉन्टिनेंटलजवळ दहशतवादी हल्ला झाला होता.

 

 

Related posts: