|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजयनगर येथे आज मराठी सांस्कृतिक संमेलन

विजयनगर येथे आज मराठी सांस्कृतिक संमेलन 

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ बेळगाव पश्चिम विभागातर्फे रविवार दि. 28 रोजी विजयनगर (हिंडलगा) येथील संतमीरा मराठी शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. साई नंदन साहित्य नगरीत होणाऱया या पाचव्या संमेलनात सहभागी होणाऱया साहित्यिकांच्या तसेच  रसिकांच्या स्वागतासाठी विजयनगर व हिंडलगा ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. स्वागतासाठी ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत.

सकाळी आठ वाजता विजयनगर येथील साई मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता शरद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पाच सत्रात संमेलन होणार आहे. सकाळी अकरा वाजता पहिल्या सत्रात मुंबई येथील सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱया सत्रात ‘हास्यधारा’ हा कार्यक्रम सोलापूर येथील नारायण सुमंत सादर करणार आहेत. तिसऱया सत्रात सांगलीचे शांतीनाथ मांगले हे विनोदी कथाकथन सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन ते अडीचपर्यंत स्नेहभोजन आहे. साई डेव्हलपर्सचे पी. सी. कोकितकर, शिवाजी अतिवाडकर, सुरेश अगसगेकर यांच्या सौजन्याने हे स्नेहभोजन होणार आहे. दुपारी अडीच वाजता चौथ्या सत्रात ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या विषयावर पुणे येथील सौरभ करडे यांचे व्याख्यान होणार आहे. शेवटच्या पाचव्या सत्रात मंथन अकादमीतर्फे नृत्यविकाराचा कार्यक्रम होणार आहे.

शोभायात्रेत लेझीम पथक, रथ, भजनी मंडळ, गंगा कलश घेतलेल्या सुवासिनी, विद्यार्थ्यांचे इतिहासावर आधारित सजीव देखावे व ढोल पथक राहणार आहे. साईमूर्ती पूजन सोमनाथ कुडचीकर, ग्रंथ पूजन प्रविण देसाई, पालखी पूजन आर. आय. पाटील, शोभा यात्रेचा शुभारंभ हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणुका भातकांडे, शिवगिरी मंदिरात पूजन विजय बाडीवाले व गणेशपूजन यादो कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.

उद्योजक सुरेश रेडेकर, अशोक तरळे, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरूण कटांबळे, मार्कंडेय साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी पाटील, मार्कंडेय सोसायटीचे चेअरमन प्रसाद चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संत ज्ञानेश्वर विचार पीठाचे उद्घाटन प्रतिभा कृषी सेवाकेंद्राचे संचालक आकाश किणेकर, हुतात्मा स्मारक पूजन ऍड. सुधीर चव्हाण, गणेश पूजन अमृत मलम फॅक्टरीचे शैलेश जोशी, छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन डॉ. भावकू कडेमनी, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन ए. पी. एम. सी. चेअरमन निंगाप्पा जाधव, संत तुकाराम महाराज प्रतिमा पूजन पायोनियर बँकेचे चेअरमन परशराम शहापूरकर, सरस्वती प्रतिमा पूजन महापौर संज्योत बांदेकर, जोतिबा फुले प्रतिमा पूजन ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी पिसे, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन माजी नगरसेविका निलिमा पावशे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन शंकर गर्डे, नेताजी सुभाषचंद बोस प्रतिमा पूजन सुरेश अगसगेकर, स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन उद्योजक विजय कंग्राळकर, महात्मा गांधी प्रतिमा पूजन उद्योगपती अनिल जाधव, नटराज पूजन उद्योजक जगन्नाथ करडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.