|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी-दुचाकी अपघातात युवक ठार

एसटी-दुचाकी अपघातात युवक ठार 

वार्ताहर / मालवण:

बेळणे-बागायत-मालवण मार्गावरील बागायत भोगलेवाडी येथे एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सदानंद बोडेकर (24, रा. हरकुळ खुर्द) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र नागेंद्र बोडेकर याला उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

रविवारी पहाटे आंगणेवाडी यात्रा आटोपून मंगेश सदानंद बोडेकर व रवींद्र नागेंद्र बोडेकर हे पॅशन प्रो ही दुचाकी घेऊन कणकवलीच्या दिशेने जात होते. याचवेळी कुडाळ-आंगणेवाडी ही ज्यादा एसटी बस आंगणेवाडीच्या दिशेने येत होती. बेळणे- बागायत-भोगलेवाडी चढावावर एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश बोडेकर हा जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला रवींद्र बोडेकर हा जखमी झाला. जखमी बोडेकर याला अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले होते. मंगेश बोडेकर याचा मृतदेह विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिसांचा तपास सुरू आहे.

Related posts: