|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » भिवंडीत गोदामांना भीषण आग ; 15 दुकाने जळून खाक

भिवंडीत गोदामांना भीषण आग ; 15 दुकाने जळून खाक 

ऑनलाईन टीम / भिवंडी :

भिवंडीत एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.भिवंडीतील गायत्री नगर परिसरातील सरदार कंपाऊंमधील सुमारे 15 ते 16 दुकाने जळून खाक झाली आहेत. मंगळवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीने लगेचच रौद्ररूप धारण केले.

दरम्यान, अद्यापही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. घटनास्थळी भिवंडी, कल्याण व उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाडय़ा दाखल झाल्या असून त्यांचे आग विझवण्यात प्रयत्न सुरू आहेत.