|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » चंद्राबाबूही शिवसेनेच्या मार्गाने ?

चंद्राबाबूही शिवसेनेच्या मार्गाने ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशभरात झालेल्या 2014 आणि त्यानंतर अनेक निवडणुकांतील यश मिळवल्यानंतर भाजपासोबत शिवसेनेने युती करून सत्तेत भागीदारी केली होती. भाजपासोबत युती ठेवायची का नाही, यासंदर्भात चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्षही आता निर्णय घेणार आहे. तसेच भाजपासोबतची युती तोडणार की नाही, याबाबत उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

युतीतील घटक पक्षाला भाजपा किंमत देत नाही. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात सहभागी करून घेत नसल्याने युतीतील पक्षाला भाजपाविरूद्ध एकवटण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या ज्ये÷ नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी बोलावली आहे.