|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » ‘ऍक्सिस बँक’ लुटणाऱ्या तिघांना अवघ्या 72 तासात अटक

‘ऍक्सिस बँक’ लुटणाऱ्या तिघांना अवघ्या 72 तासात अटक 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड

ऍक्सिस बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 74 लाख रूपयांची रोकड लांबविल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

त्रिंबक नैरागे, अमोल धुते आणि विठ्ठल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर वाहनचालक रणजित कोरेकर हा फरार आहे. पुण्यातील पिंपळे सौदागर येथे 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ऍक्सिस बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 74 लाखांची रोकड घेऊन वाहनचालक गाडीसह पसार झाला होता. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी तपासाअंती तिघांना अटक केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून तिघांनी ही रक्कम पळवली असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. तसेच संबंधित चालकाला कोणतीही रक्कम न देता तिघांमध्ये वाटून घेतल्याची कबुली त्यांनी दिली आहे.