|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात 10, 11 फेब्रुवारीला ‘हिंदू गर्जना चषक’ कुस्ती स्पर्धा

पुण्यात 10, 11 फेब्रुवारीला ‘हिंदू गर्जना चषक’ कुस्ती स्पर्धा 

ऑनलाईन टीम / पुणे

‘हिंदू गर्जना प्रतिष्ठान’ आणि ‘साने गुरूजी नगर तरुण मंडळ’ यांच्या संयुत्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने पुण्यात ‘हिंदू गर्जना चषक’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 10 फेब्रुवारी व 11 फेब्रुवारी सणस स्पोर्टस् ग्राऊंडवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कुमार गट, खुला गट अशा वेगवेगळय़ा तेरा वजनी गटामध्ये स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना साडेपाच लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

खुल्या गटातील विजेत्याला एक लाख रुपयाचा धनादेश, बुलेट गाडी व चांदीची गदा देण्यात येणार आहे. उपविजेत्याला 51 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकावरील विजेत्याला 25 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. कुमार गटातील विजेत्यांना 25 हजार रुपराचा धनादेश व चांदीची गदा, तर द्वितीय विजेत्याला दहा हजार, तर तृतीय विजेत्याला सात हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ही कुस्तीस्पर्धा भव्य आणि आकर्षक असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके याचाही विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक नगरसेवक धीरज घाटे यांनी दिली आहे.