|Sunday, January 20, 2019
You are here: Home » विविधा » भूरभूर पाऊस पडे..;अवकाळी!

भूरभूर पाऊस पडे..;अवकाळी! 

ऑनलाईन टीम / पुणे

पश्चिम, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांत बुधवारी भूरभूर पाऊस झाला. त्याचबरोबर ढगाळ वातावरणाची छायादेखील महाराष्ट्राने पुढील 48 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 11 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, कोकण, नगर, सातारा, नांदेड औरंगाबादसह मराठवाडय़ाच्या काही भागांतही भूरभूर झाली. विदर्भाच्या काही भागातही हेच चित्र पाहायला मिळाले. बुधवारी दिवसभर राज्याच्या अनेक भागांत ढगांची दाटी दिसून आली. त्यामुळे काहीसा उकाडाही जाणवला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगावात 14.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

Related posts: