|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » मंत्रलयाचे ‘आत्महत्यालय’ झाले : राज ठाकरे

मंत्रलयाचे ‘आत्महत्यालय’ झाले : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ झाले अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने सांगत असत. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ बनले आहे. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजपा सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असे राज यांनी म्हटले.

 

 

 

Related posts: