|Sunday, January 20, 2019
You are here: Home » leadingnews » जीएसटीसाठी सरकार मध्यरात्री संसदेत, मग राममंदिरासाठी का नाही?

जीएसटीसाठी सरकार मध्यरात्री संसदेत, मग राममंदिरासाठी का नाही? 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद

जीएसटीलागू करण्यासाठी सरकारकडून अर्ध्या रात्री संसद बोलविली जात असेल, तर मग राममंदिरासाठी हे पाऊल का उचलले जात नाही, असा सवाल करीत विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारवर आज निशाणा साधला.

तोगडिया हे दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱयावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, भाजपा सत्तेत येऊन साडे तीन वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा सरकारला राममंदिराचा प्रश्न सोडविता आला नाही. राममंदिर बनविण्यासाठी जनतेने भाजपाला निवडून दिले आहे, ट्रिपल तलाकचा कायदा बनविण्यासाठी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. लोकसभेत भाजपाला पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत नाही. तर दोन्ही सभागृहाचे एकत्र सत्र बोलावून राममंदिराचा कायदा संमत करून घ्यावा. अयोध्येत राममंदिर व्हावे; पण शेजारी मशीद बनवू नये, असे सांगत तोगडिया यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.

तोगडिया गुरुवारी विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असलेल्या तोगडियांसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील तब्बल 400 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावला आहे.

Related posts: