|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » पिंपरी स्थानकात सापडली आठ दिवसाची चिमुरडी

पिंपरी स्थानकात सापडली आठ दिवसाची चिमुरडी 

ऑनलाईन टीम / पिंपरी

पिंपरी रेल्वे स्थानकात आठ दिवसाच्या चिमुरडीला बाकडय़ावर सोडून तीच्या आईने पळ काढण्याची घटना घडली आहे.

नीलम गायकवाड या महिला प्रवाशाला प्लॅटफार्म क्रमांक दोनवरील बाकडय़ावर त्यांना लहान बाळ दिसले. बाळाजवळ शाल, गुलाबी रंगाची टोपी, दुधाची बॉटल सापडली. गायकवाड यांनी आजुबाजूला बाळाच्या आईचा शोध घेतला. मात्र, तिथे कोणीही आढळून न आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पिंपरी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या बाळाला पुण्यामधील बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळाच्या आईचा व परिवाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: