|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » अंजली दमानियांविरोधातील अटक वॉरंट रद्द

अंजली दमानियांविरोधातील अटक वॉरंट रद्द 

ऑनलाईन टीम / जळगाव

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी मुंबईस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयाचे न्या. डी. जी. मालविय यांनी जारी केलेले अटक वॉरंट दमानिया यांच्या आजारपणाचे कारण मान्य करण्यात आल्याने शुक्रवारी रद्द करण्यात आले. यामुळे दमानिया यांना दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने दोन वेळा समन्स बजावूनही अंजली दमानिया सतत 7 ते 8 वेळा  सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात तातडीने अटक वॉरंट बजावण्यात आले होते. खडसे यांच्या जावयाचे लिमोझीन कारप्रकरण, भोसरी भूखंडप्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्यांचे लाच प्रकरण अशा विषयांवर अंजली दमानिया यांनी जळगावात येऊन आरोप केले होते. याविरोधात भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला क्रमांक 416 कलम 500 व 501 नुसार भरला आहे. फिर्यादीतर्फे ऍड. चंद्रजित पाटील आणि ऍड. तुषार माळी हे काम पाहत आहेत. मात्र, वॉरंट रद्द करण्यात आल्याने दमानिया यांना दिलासा मिळाला आहे.

 

Related posts: