|Saturday, March 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तिहेरी तलाकसाठी नव्हे; राम मंदिरासाठी निवडून दिले

तिहेरी तलाकसाठी नव्हे; राम मंदिरासाठी निवडून दिले 

प्रवीण तोगडिया यांचा मोदी सरकारला टोला :  दोन दिवशीय औरंगाबाद दौरा

औरंगाबाद / प्रतिनिधी

राममंदिर बनविण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तिहेरी तलाकचा कायदा बनविण्यासाठी नव्हे; हे सत्ताधाऱयांनी लक्षात ठेवावे, असा टोला लगावत विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारवर शुक्रवारी निशाणा साधला.

तोगडिया हे दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱयावर आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जीएसटी लागू करण्यासाठी सरकारकडून अर्ध्या रात्री संसद बोलविली जात असेल, तर मग राममंदिरासाठी हे पाऊल का उचलले जात नाही, हे कळत नाही. भाजप सत्तेत येऊन साडेतीन वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा सरकारला राममंदिराचा प्रश्न सोडविता आलेला नाही. हे दुर्दैवी आहे. राममंदिर बनविण्यासाठी जनतेने भाजपला निवडून दिले आहे, तिहेरी तलाकचा कायदा बनविण्यासाठी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत नाही. हे पाहता दोन्ही सभागृहाचे एकत्र सत्र बोलावून राममंदिराचा कायदा संमत करून घ्यावा. अयोध्येत राममंदिर व्हावे; पण शेजारी मशीद बनवू नये, असे सांगत तोगडिया यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

तोगडियांना झेड प्लस सुरक्षा

बेपत्ता प्रकरणाचा गाजावाजा व त्यानंतर सरकारवर जाहीर टीकाटिप्पणी करणारे तोगडिया आजपासून औरंगाबाद, परभणी दौऱयावर येणार आहेत. त्यांना झेड प्लस सुरक्षा असून शहर व ग्रामीण पोलीस दलातील सुमारे एक हजार पोलिसांचे सुरक्षाकवचही त्यांना असणार आहे, अशी माहिती शहर पोलीस दलाकडून देण्यात आली. तोगडिया 15 जानेवारीला सकाळी बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. या साऱया प्रकरणावर त्यांनी गुजरातमध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा व पंतप्रधानांकडून जीवाला धोका असल्याची जाहीर टिप्पणी केली होती. यानंतर आता प्रवीण तोगडिया महाराष्ट्रातील औरंगाबाद दौऱयावर आहेत.

वेरुळला अभिषेक करणार

तेगडिया शनिवारी सकाळी सहाला वेरुळ येथील घृष्णेवर तसेच भद्रामारोतीचे दर्शन करून अभिषेक करतील. त्यानंतर शनीशिंगणापूरला जातील. तेथून औरंगाबादेत दोनला परतून सव्वा चारला दिल्लीला रवाना होतील.

Related posts: