|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » क्रिडा » अखिल कुमार अपराजित

अखिल कुमार अपराजित 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शनिवारी येथे झालेल्या व्यावसायिक मुष्टीयुद्ध लढतीत भारताचा अनुभवी मुष्टीयोद्धा अखिल कुमारने टांझानियाच्या सादिकी मोंबाचा तांत्रिक गुणावर पराभव केला. व्यावसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रा अखिल कुमारने आपली विजयी घोडदौड कायम राखली असून त्याची या क्षेत्रातील ही दुसरी लढत आहे.

विश्व मुष्टीयुद्ध मंडळातर्फे ही लढत आयोजित करण्यात आली होती. 35 वर्षीय अखिल कुमारने या लढतीतील पहिल्याच फेरीत मोंबावर आपले वर्चस्व ठेवले होते. सहा फेऱयांच्या या लढतीत अखिल कुमारने मोंबाचे आव्हान संपुष्टात आणले. 61.2 लाईटवेट गटातील सहा फेऱयांच्या अन्य एका लढतीत भारताच्या जितेंद्र व

कुमारने जॉर्जियाच्या नेव्हाराचा तांत्रिक गुणांवर पराभव केला. या क्षेत्रात जितेंद्र कुमारने आपल्या आतापर्यंत दोन्ही लढती जिंकल्या असून तो अखिल कुमार प्रमाणे अपराजित राहिला आहे. 

Related posts: