|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींचा 3 देशांचा दौरा ठरला यशस्वी

मोदींचा 3 देशांचा दौरा ठरला यशस्वी 

ओमानमधील मशिद तसेच हिंदू मंदिराला दिली भेट : भारतीयांना केले संबोधित, अनेक द्विपक्षीय करार

वृत्तसंस्था/ मस्कत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओमानच्या दौऱयादरम्यान मस्कत येथील सुमारे 200 वर्षे जुन्या शिव मंदिराला भेट देत पूजा केली. यानंतर ओमानमधील प्रसिद्ध सुलतान कबूस मशिदीची मोदींनी पाहणी केली. रविवारी दोन्ही देशांदरम्यान पर्यटन आणि सैन्य सहकार्यासमवेत 8 करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून सोमवारी भारतात परतले.

मस्कतमधील मोतीश्वर मंदिरात मोदींनी सोमवारी पूजा केली. या मंदिरानजीक एक विहिर आहे. वाळवंटाच्या मधोमध असून देखील ही विहिर कधीच आटत नसल्याचे सांगितले जाते. या मंदिराला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी ओमानचे उपपंतप्रधान सय्यद असद बिन अल-सैद यांच्यांशी चर्चा केली.

सागरी व्यूहनीतीसाठी दौरा महत्त्वपूर्ण

मोदींचा ओमान दौरा सागरी व्यूहनीती संबंधांसाठी महत्त्वाचा मानला जातोय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करत दोन्ही देशांच्या संबंधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी सुलतान कबूस बिन सैद-अल-सैद यांच्यासोबत चर्चा केल्याचे सांगितले.

भारतीयांना केले संबोधित

मोदींनी मस्कतच्या स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. मी चहावाला आहे, यामुळे 90 पैशांमध्ये चहा मिळत नसल्याचे माहिती आहे. परंतु आम्ही 90 पैशांमध्ये विमा देत आहोत असे प्रतिपादन मोदींनी केले. या स्टेडियमच्या रॉयल बॉक्समधून भाषण देणारे मोदी हे पहिलेच विदेशी अतिथी आहेत. या बॉक्सचा वापर केवळ ओमानचे राजेच करत आले आहेत.

द्विपक्षीय करार..

  1. नागरी आणि वाणिज्यिक प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि न्यायिक सहकार्यावर करार.
  2. राजनयिक, विशेष सेवा आणि अधिकृत पारपत्रधारकांसाठी व्हिसा सूट देण्यावर करार.
  3. आरोग्य क्षेत्रात सहकार्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक करार करण्यात आला आहे.
  4. अंतराळ मोहिमांच्या शांततापूर्ण वापरातील सहकार्याकरता दोन्ही देशांदरम्यान करार.
  5. विदेश सेवा संस्था, विदेश मंत्रालय, भारत आणि ओमान राजनयिक संस्थेदरम्यान करार.
  6. राष्ट्रीय संरक्षण अध्ययन आणि विश्लेषणासाठी शैक्षणिक सहकार्यासाठी झाला करार.
  7. भारत आणि ओमानदरम्यान पर्यटन सहकार्याच्या क्षेत्राकरता करारावर स्वाक्षऱया.
  8. दोन्ही देशांदरम्यान सैन्य सहकार्यासाठी करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या.

Related posts: