|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा धडक मोर्चा 

आंदोलनात केवळ पदाधिकारी व नेत्यांचा सहभाग

प्रतिनिधी/सोलापूर

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँगेसच्या वतीने सायकल व बैल गाडी वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

भाजप सरकारने इंधन दरवाढीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. किमान मुलभूत दर निश्चित करण्याची गरज आहे. असे असताना सरकारने दुष्काळाच्या नावाखाली इंधनावर सरचार्ज लावून गरीबांच्या खिशाला कात्री लावली. जीएसटी अंतर्गंत पेट्रोल व डिझेलचा समावेश करण्यास भाजप सरकार तयार नाही. सरकारच्या धोरणामुळे गरीबांचे हाल होत आहेत. सरकारच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ सोमवारी हा धडक मोर्चा काढण्यात आला.

कन्ना चौक येथून या धडक मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चामध्ये सायकल व बैल गाडीवरून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कन्ना चौक मार्गे जोडबसवण्णा चौक, बुधवार बाझार, विजापूर वेस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे सभेत रूपातंर झाले. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, दिलीप माने, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह पदाधिकाऱयांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. विविध मागण्याचे फ्ढलक घेवून कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे, माजी आ. निर्मला ठोकळ, माजी अध्यक्ष धर्मा भोसले, अशोक कलशेट्टी, केशव इंगळे, सुनिल रसाळे, नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रविण निकाळजे, विनोद भोसले, नगरसेविका फ्ढिरदोस पटेल, अनुराधा काटकर, इंदुमती अलगोंडा, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी महापौर अलका राठोड, हाजी मलंग नदाफ्ढ, तौफ्ढिक हत्तुरे, तिरूपती परकीपंडला, मनिष गडदे, विद्या काळे, प्रमिला तुपलवंडे, नागनाथ कदम, नरसिंग कोळी अरूणा शर्मा, सुमन जाधव, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केवळ पदाधिकारी व नेत्यांचीच उपस्थिती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱयावर असतानाही तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या या धडक मोर्चात गर्दी कमी होती. चार माजी आमदार व एक विद्यमान आमदार यांच्यासह प्रदेश व स्थानिक पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती. सुमारे 100 जणांची उपस्थिती या मोर्चात होती. माजी आमदार व विद्यमान आमदारांनी थोडे थोडे जरी कार्यकर्ते आणले असते तर या मोर्चात गर्दी दिसून आली असती. अशी चर्चा ऐकायला मिळाली

दर वाढीचा सर्वसामान्यांना फ्ढटका : आ. शिंदे

पेट्रोल, गॅस, †िडझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना फ्ढटका बसत आहे. जनता बेहाल बसत आहे. देश वाचविण्यासाठी काँगेस रस्त्यावर उतरली आहे. जनतेच्या समस्याबद्दल पतंप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नाहीत. केवळ काँगेसवर टीका करतात. असा आरोप करत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली. जनतेमध्ये सरकार विरोधात तीव्र संताप आहे. भाजप जाती धर्माच्या नावाने संतुलन बिघडत आहे. राष्ट्रीय स्वयंसघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शहिदांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. याचा निषेध आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

आमदार शिंदे यांच्या हातात स्पिकर (साऊंड)

मोर्चावेळी माजी आमदार व पदाधिकाऱयांची एकापाठोपाठ भाषणे झाली. माजी आ. दिलीप माने, माजी आ. प्रकाश यलगुलवार, माजी आ. विश्वनाथ चाकोते हे माईक घेवून भाषण करत होते. मात्र साऊंड (कर्णा) आमदार प्रणिती शिंदे यांच्या हातात होता. त्यामुळे कितीही बोलले तरी आवाजाची मर्यादा जणू मात्र साऊंडच्या रूपात आमदार शिंदे यांच्या हातात असल्याचे दिसून आले. यामुळे याची चर्चा आंदोलनस्थळी होत होती.

Related posts: