|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प.महाराष्ट्रात 1 लाख 75 हजार वीज मीटर उपलब्ध

प.महाराष्ट्रात 1 लाख 75 हजार वीज मीटर उपलब्ध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   महावितरणकडून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिह्यासाठी सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 75 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ही संख्या आवश्यकतेपेक्षा दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन वीजमीटर उपलब्ध नसल्याच्या कोणत्याही माहितीवर वीज ग्राहकांनी विश्वास ठेवू नये अथवा कुठल्याही स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

   पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणच्या सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी एक लाख नवीन वीज मीटर लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे नवीन वीज जोडणी देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. तसेच नादुरुस्त वीज मीटर सुद्धा तातडीने बदलवण्यात यावेत, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. या कामात किंवा वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीज ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचाऱयांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक संचालक  ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

  पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिह्यांत 6 फेब्रुवारीपर्यंत सिंगल फेजचे तब्बल 1 लाख 55 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त साधारणपणे आणखी 1 लाख नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सिंगल फेजचे पुणे जिह्यात 88100, सातारा – 15250, सोलापूर – 15800, कोल्हापूर- 10500 व सांगली जिह्यात 25,760 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. याशिवाय 20 केडब्लूपेक्षा अधिक व कमी वीजभार असणाऱया थ्री फेजच्या स्वतंत्र नवीन वीज जोडणीसाठी सुद्धा आवश्यकतेपेक्षा दुप्पटीने वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महावितरणची मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ’ऑनलाईन’ केलेली झालेली आहे. त्यामुळे साधन सामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे. तसेच नवीन मीटर वीज जोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटरऐवजी बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क साधावा. याशिवाय मुंबई येथील विशेष मदत कक्षातील 022-26478989 किंवा 022-26478899 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तसेच 24 तास सुरु असललेल्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related posts: