|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कपिलेश्वर उड्डाणपुलावर पुन्हा केंडी

कपिलेश्वर उड्डाणपुलावर पुन्हा केंडी 

बेळगाव / प्रतिनिधी

कपिलेश्वर उड्डाणपुलावर या ना त्या कारणामुळे उद्भवणाऱया वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे. परंतु या कोंडीवर उपाययोजनांसाठी रहदारी पोलीसांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. सायंकाळी हमखास होणाऱया गर्दीच्या वेळी याठिकाणी अधिक रहदारी पोलीसांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

कपिलेश्वर उड्डाणपुलावर होणाऱया रहदारीच्या कोंडीवर उपाययोजनांकरिता दोन्ही बाजुला रहदारी पोलीसांची गरज आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या मध्यभागी देखील रहदारी पोलीसांचे नियंत्रण आवश्यक आहे. परंतु अपुऱया मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे दिसत आहे.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वाहनांची गर्दी वाढली होती. त्यावेळी पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती घडली. यामुळे रहदारीच्या कोंडीचा फटका नागरिकांना सोसावा लागला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळापर्यंत नागरिक आपली वाहने पुढे सरकविण्याचा आटापीटा करीत होते. मात्र पुढील वाहने थांबून राहिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.

 

Related posts: