|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News » ‘ओएनजीसी’ च्या जहाजावर स्फोट

‘ओएनजीसी’ च्या जहाजावर स्फोट 

ऑनलाईन टीम / कोची

कोची येथील शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यास्फोटामध्ये पाच कामगार ठार, तर अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

ओएनजीसीचे जहाज कोचीन शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आले होते. स्फोटाचे कारण अद्यापही समजू शकले नाही. घटनास्थळी बचाव पथकाने व पोलिसांनी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू आहे. जहाजाच्या टाकीत दोन कामगार अडकल्याचे समजते आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मृत झालेल्या दोघांची ओळख पटली असून, गेवीन व रामशाद अशी त्यांची नावे आहेत.

 

Related posts: