|Saturday, May 26, 2018
You are here: Home » Top News » ‘दहशतवाद्यांचे काय झाले?’; शुद्धीवर येताच मेजरचा सवाल

‘दहशतवाद्यांचे काय झाले?’; शुद्धीवर येताच मेजरचा सवाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

सुंजवान येथील लष्कराच्या कँपवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेजर अभिजित यांना रुग्णालयात शुद्ध येताच ‘दहशतवाद्यांचे काय झाले?’ असा प्रश्न विचारत त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविले आहे.

सुंजवानमधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मेजर जखमी झाल्याने बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना शुद्ध आली असता त्यांनी पहिला प्रश्न विचारून सर्वांनाच अचंबित केले. दहशतवादय़ांचे काय झाले, असा प्रश्न करीत आपल्या प्रकृतीपेक्षा कर्तव्यनिष्ठेची अधिक काळजी असल्याचे जणू त्यांनी अधोरेखित केले. सध्या मेजर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच रूजू होण्यास उत्सुक आहेत.

 

Related posts: