|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » धर्मसंस्थेत पुरुषांचे स्थान वर ठेवण्याची व्यवस्था!

धर्मसंस्थेत पुरुषांचे स्थान वर ठेवण्याची व्यवस्था! 

पुरुष सत्ता व्यवस्थेच्या महिला बळी : ‘मिळून साऱयाजणी’च्या चर्चासत्रात विद्या बाळ यांचे मत

वार्ताहर / कणकवली:

धर्मसंस्थेत पुरुषांचे स्थान वर ठेवण्यात आले आहे. धर्मसंस्थेच्या कर्मकांडात महिलेच्या मनात परिवर्तनाचा विचार रुजूच नये, अशी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुरुष सत्ता व्यवस्थेच्या आपण महिला बळी आहोत. महिलांप्रमाणे पुरुषांनी पत्नीसाठी व्रत-वैकल्य का करायचे नाही, असा प्रश्न विख्यात सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ विचारवंत विद्या बाळ यांनी येथे उपस्थित केला.

विख्यात सामाजिक कार्यकर्त्या तथा विचारवंत विद्या बाळ आणि ‘मिळून साऱयाजणी’ मासिकाच्या संपादिका, ख्यातकीर्त स्त्राrवादी कार्यकर्त्या गीताली वि. म. (पुणे) यांच्या चर्चासत्राचे आयोजन मिळून साऱयाजणी-सखी ग्रुपतर्फे येथील मराठा मंडळ सभागृहात केले होते. उद्घाटनप्रसंगी महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना विद्या बाळ बोलत होत्या. चर्चासत्रात महिलांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. व्यासपिठावर गीताली वि. म., वैशाली पंडित, वंदना करंबेळकर आदी उपस्थित होत्या. महिलांनी अनेक प्रश्न मांडत समस्यांचे निराकरण करून घेतले. तसेच स्त्राrयांच्या बाबतीत घडणाऱया घटना व त्या अनुषंगाने असलेल्या चर्चा याबाबत चर्चा घडवून आणली. या चर्चासत्राला महिलांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

पुरुष आणि स्त्राr असा कोणताच भेद न करता निव्वळ माणूस म्हणून स्त्राr आणि पुरुषाकडेही पाहिले जावे, असा विचार विद्याताईंनी मांडला. धर्मसत्तेचे आम्ही समर्थन करीत नाही मात्र अनेक संत, महंतांमध्ये रुजत चाललेली पंचतारांकित स्टाईल ही सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. स्त्राrयांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची गरज आहे. महिलांनी कसला वेश परिधान करावा हे स्वत: ठरवायचे असतानाच आपण दुसऱयाला कसे दिसतो, त्यापेक्षा स्वत:ला कसे दिसू, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विद्या बाळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

गिताली वि. म. म्हणाल्या, आडनाव लावणे हे आपल्याला जातीयतेकडे घेऊन जाणारे आहे. माणसाच्या आडनावावरून अनेकदा त्यांची जात ओळखल्याचे दिसून येते. त्यामुळे जातीय व्यवस्था दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्म ही संस्थात्मक पद्धत झाली असून ती बदलणे आता खूप कठीण झाले आहे. धर्मांचे संस्थानीकरण होत चालले आहे.

वैशाली पंडित यांनी मालवण येथे नवरात्रोत्सवात राबविलेल्या नवदुर्गा उपक्रमाची माहिती देत अशा उपक्रमातून महिलांनी प्रेरणा घेत काम करण्याची गरज आहे. नवदुर्गा व्रताच्या माध्यमातून सफाई कामगार महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्या कार्याचा व कृतीचा गौरव करण्याचे काम केले. या अनुभवाने त्या महिलाही भारावून गेल्याच पण या साऱया अनुभवातून मी श्रीमंत झाल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व पुरुष ही समाजातील दरी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी बंधने महिलांनाच का? पुरुषांना ही बंधने का नाहीत, असा प्रश्न केला. त्यावर हा धर्म व सामाज व्यवस्थेचा भाग असून, तो बदलण्याचे काम केले पाहिजे, असे मत विद्या बाळ यांनी मांडले. डॉ. शमिता बिरमोळे यांनी कलमठ येथे महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रमाऐवजी तिळगूळ उपक्रम राबवित या कार्यक्रमातील वाणाऐवजी ती रक्कम सामाजिक उपक्रमासाठी देण्याच्या सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

Related posts: