|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीमंत परिवारांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ

श्रीमंत परिवारांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे समोर आले. 2017 या गेल्या वर्षात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये वेगाने वृद्धी झाल्याचे सांगण्यात आले. 25 कोटी अथवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असणाऱया अतिश्रीमंत कुटुंबांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ होत त्यांची संख्या 1.60 लाख वर पोहोचली आहे.

देशातील अतिश्रीमंतांच्या संपत्तीमध्ये केवळ 5 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 153 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कोटक वेल्थ मॅनेजमेन्टकडून सांगण्यात आले. देशातील अतिश्रीमंतांच्या संपत्तीमध्ये कशा प्रकारे वाढ होते आणि त्ये कशा प्रकारे खर्च करतात हा संशोधनाचा विषय आहे. या संशोधनानुसार देशातील अतिश्रीमंतांच्या परिवारामध्ये पुढील पाच वर्षात दुप्पट वाढ होत 3.30 लाखवर पोहोचेल. या घराण्यांची संपत्ती 352 लाख कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. देशातील श्रीमंत घराण्यांवर नोटाबंदी आणि जीएसटी, जीडीपीमध्ये घट होणे याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही असे सांगण्यात आले. लहान शहरांमध्ये अतिश्रीमंतांमध्ये वाढ होत असून पुढील काही वर्षात हे चालूच राहील.

Related posts: