|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला लाच घेतांना अटक

चंदगडच्या महिला कॉन्स्टेबलला लाच घेतांना अटक 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर

पासपोर्टचे काम त्वरीत करुन देण्यासाठी तीनशे रूपयाची लाच घेतांना चंदगड पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलला लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदारांना परदेशात जायचे असल्याने त्यांनी पासपोर्टसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी कोल्हापूर कार्यालयामध्ये केली होती. या कार्यालयाने त्यांची चारीत्र पडताळणीसाठी कागदपत्रे चंदगड पोलीस ठाण्यात पाठविली. पासपोर्ट विभागाचे कामकाज दीपाली खडके पाहत होती. तिने पासपोर्टचे काम करून देण्यासाठी तीनशे रूपयाची मागनी केली. यावर नंतर काम करूयात असे म्हणत तक्रारदार ठाण्यातून बाहेर गेले. त्यानंतर ते थेट लाचलूचपत विभागात जावून खडके विरोधात तक्रार दिली. लाचलूचपत विभागाच्या दोन पंचासमक्ष तक्रारदारांना चंदगड पोलीस ठाण्यात पाठविले व यावेळी खडके हिने तीनशे रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदारांनी पंचासमक्ष खडकेला तीनशे रूपये दिले. त्यानंतर पथकातील काही कर्मचाऱयांनी आतमध्ये धाव घेतली. हे खडसेंच्या लक्षात येताच तिने तीनशे रूपये तोंडात टाकून चावून गिळण्याचा प्रयत्न केला. पथकातील महिला काँन्स्टेबलने तिला जागेवर धरून तिच्या तोंडातून नोटांचे तुकडे बाहेर काढले. या वृत्ताने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. लाचलूचपत विभागाच्या कारवाईचा अहवाल प्राप्त होताच खडकेंना खात्यातून निलंबीत केले जाणार आहे.

Related posts: