|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात तेजी 

वृत्तसंस्था /मुंबई :

आंतरराष्ट्रीय पातळीवरून चांगले संकेत मिळाल्याने बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. मात्र दिवसातील शेवटच्या तासात नफा कमाई झाल्याने दिवसातील तेजी बाजाराने गमावली. अखेरीस निफ्टी 0.4 टक्क्यांनी वधारला. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टी 10,816 आणि सेन्सेक्स 34,535 पर्यंत वधारला होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरत 16,803 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.1 टक्क्यांनी कमजोर होत 19,927 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.25 टक्क्यांनी घसरत 18,258 वर बंद झाला.

बीएसईचा सेक्सेक्स 141 अंशाने वधारत 34,297 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 44 अंशाच्या तेजीने 10,548 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी वधारत 25,424 वर बंद झाला.

वाहन, मीडिया, औषध, पीएयसू बँक, रियल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागात विक्री झाली. धातू, खासगी बँक, एफएमसीजी, आयटी, तेल आणि वायू समभागात खरेदी दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

हिंडाल्को, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, वेदान्ता, एचपीसीएल, इन्फोसिस, ओएनजीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी 3.4-0.9 टक्क्यांनी वधारले. भेल, इंडियाबुल्स हाऊसिंग, हीरो मोटो, सिप्ला, अरबिंदो फार्मा, भारती एअरटेल, टाटा स्टील, एल ऍण्ड टी 3-0.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात अपोलो हॉस्पिटल, ओबेरॉय रियल्टी, टाटा केमिकल्स, टोरेन्ट फार्मा 2.3-1 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स कॅपिटल, अल्केम लॅब, वॉकहार्ट, एनएलसी इंडिया 5.4-3.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभ्घगात शैली इंजिनियरिंग, एडीएफ फूड्स, बॉम्बे डाईंग, सेन्चुरी एंका, कॅपिटल ट्रस्ट 10.25-5.9 टक्क्यांनी वधारले. गीतांजलि जेम्स, प्रिज्म सिमेंट, इन्ट्रासॉफ्ट टेक, कॅमलिन फाईन, युनिकेम लॅब्स 20-8.5 टक्क्यांनी घसरले.