|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » चांगली कामगिरी करूनही संघाबाहेर ठेवले : सुरेश रैना

चांगली कामगिरी करूनही संघाबाहेर ठेवले : सुरेश रैना 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘चांगली कामगिरी करूनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. ज्ग्नयामुळे मी खूप दुखावलो होतो ,अशी नाराजी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केली आहे. पण आता रैनाने बऱयाच कालावधीनंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केल्याने मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे. ‘मी दुःखी झालो होतो कारण की, चांगली कामगिरी करूनही मला संघातून बाहेर ठेवण्यात आले होते,पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे.त्यामुळे मी आता पूर्णपणे फिट आहे.एवढया महिन्यांच्या कठोर ट्रेनिंगमुळे भारतासाठी खेळण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाल्याचे रैनाने सांगितले. तसेच देशासाठी जास्तीत जास्त दिवस खेळावे हाच माझा प्रयत्न असणार आहे. मला 2019चा विश्वचषक खेळायचा आहे.कारण मला माहिती आहे की,माझी इंग्लंडमध्ये कामगिरी चांगली होती.माझ्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे.त्यामुळे मला आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ती टी-20मध्ये चांगली कामगिरी करायची आहे, असेही रैना यावेळी म्हणाला