|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला नागरिकांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

छिंदमची रवानगी एक मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अहमदनगर भाजपमध्ये फूट पडली आहे. शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्याला किंवा पक्षाची कर्याकारिणी बरखास्त करावी अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकरिणी सदस्य अभय आगरकर यांनी केली आहे.