|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » नवी मुंबईतील विमानतळाच्या भूमिपूजनेवर शिवसेनेचा बहिष्कार

नवी मुंबईतील विमानतळाच्या भूमिपूजनेवर शिवसेनेचा बहिष्कार 

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

    नवी मुंबई येथील विमानतळाच्या भूमीपूजनाच्या आजच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना सत्ताधारी भाजपाकडून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱयांना डावलण्यात आल्याचा निषेध म्हणून, आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

    कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या दरम्यान, पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या कार्यक्रम पत्रिकेत नावांच्या समावेशाचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान कार्यालयाकडून होत आहे. असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाने दिले आहे.

 

Related posts: