|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » पाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल

पाककडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचे बिल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत काही परदेश दौऱयांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने एकूण 2 कोटींचा खर्च केला आहे, यात 2.86 लाख रूपयांचे बिल पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे.

परदेशी दौऱयांच्या ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचे एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेले,त्या त्या वेळेचे नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रूपये एवढे आहेत. निवृत्त कंमाडर लोकेश बात्रा यांनी यासंदर्भात आयटीआयमधून माहिती मागवली असता.त्यांनी ही माहिती मिळाली.जून 2016पर्यंतची माहिती बात्रा यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी आयएएफच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला,हे जाणून घेण्यासाठी बात्रांनी आरटीआयच्या माध्यमातून अर्ज केला होता.

 

Related posts: