|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » हिंदूंनी एकापेक्षा अधिक लग्न करून जास्त मुलांना जन्म घालावे – साध्वी प्रज्ञासिंह

हिंदूंनी एकापेक्षा अधिक लग्न करून जास्त मुलांना जन्म घालावे – साध्वी प्रज्ञासिंह 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद

   हिंदू धर्माचे अस्तित्व व वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंनी एकापेक्षा अधिक लग्न करावे व जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. तसेच जे लोक देशासाठी काहीच करत नाहीत त्यांनी किमान एका पेक्षा जास्त लग्न करून जास्त मुलांना जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला आहे.

   औरंगाबाद येथे जनुभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नवनाथ महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, डॉ. विभाश्री, अंबरीश महाराज, शिवाजी शेरकर, संजय बारगजे उपस्थित होते. संत तुकाराम नाटय़गृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांना बहीण-भाऊ नसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. मुलांच्या पोषणाची व सांभाळण्याची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येकांना आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. पण, हिंदूंची लोकसंख्या न वाढल्यास येणाऱया काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका येईल, असा इशाराही त्यांना यावेळी दिली. शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्न केले तरी चालेल, असा अजब सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

 

Related posts: