|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » मोबाईल क्रमांक 10 अंकीच

मोबाईल क्रमांक 10 अंकीच 

एम2एम व्यवहारासाठी 13 अंकी क्रमांक येणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोशल मीडियावर 13 अंकी मोबाईल क्रमांक जारी करण्यात येणारी बातमी सरकारकडून फेटाळण्यात आली. दूरसंचार विभागाने सामान्य नागरिकांसाठी 13 अंकी मोबाईल क्रमांक जारी करण्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे सांगितले. मात्र अधिक स्पष्टीकरण देताना मशिन टू मशिन (एम2एम) व्यवहार करण्यासाठी 13 अंकी सिम क्रमांक जारी करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. हे सर्व क्रमांक 1 जुलैपासून जारी करण्यात येणार आहेत. या क्रमांकाचा वापर फक्त इंटरनेटच्या माध्यमातून मशिनच्या साहाय्याने करण्यात येणाऱया व्यवहारांसाठी होणार. सध्या वापरात असणाऱया 10 अंकी क्रमांकाचे हस्तांतरण करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. सध्या भारती एअरटेल, व्होडाफोन, आरकॉम, बीएसएनएल या कंपन्या एम2एम सेवा देतात. एम2एमचा वापर वेयरहाऊस मॅनेजमेन्ट, रोबोटिक्स, ट्रफिक कन्ट्रोल, लॉजिस्टिक, सप्लाय मॅनेजमेन्ट, रिमोट कन्ट्रोलमध्ये करण्यात येते.