|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मेटोरोलच्या स्मार्टफोनवर तब्बल 5000 रूपयांची सूट

मेटोरोलच्या स्मार्टफोनवर तब्बल 5000 रूपयांची सूट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोटोरोलाने या मोबाईल कंपनीने फ्लिपकार्टवर स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. मोटो डेज सेलमध्ये ‘मेटो इ4 प्लस’ (3जीबी रॅम),‘मोटो एक्स 4चे’ दोन्ही व्हेरिएंट आणि ‘मोटो झेड 2 प्ले’ या स्मार्टफोनवर 5000 रूपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

हा सेल 22 फोब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार आहे. तसेच ग्राहकांना 2000रूपयांपर्यंत ऍडिशनल एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. ‘मोटो ई4 प्लस’या फोनचा 3 जीबी व्हेरिएंट मोटो सेलमध्ये 9,499 रूपयांना मिळणार आहे. या फोनची मुळ किंमत 9,999रूपयांना लाँच करण्यात आला होता. ‘मोटो एक्स 4’ या स्मार्टफोनचा 3 जीबी रॅम/ 32 जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरिंएट या सेलमध्ये 18,999 रूपयात खरेदी करता येणार आहे.याची किंमत 22,999 एवढी आहे. ‘मोटो झेड2 प्ले’ या स्मार्टफोनवर सर्वात जास्त सूट देण्यात आली आहे. या फोनवर तब्बल 5000 रूपयांची सूट देण्यात आली आहे.त्यामुळे 27,999रूपये किंमतीचा हा फोन आता 22,999 रूपयात खरेदी करता येणार आहे याशिवाय या स्मार्टफोनवर 2000 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे.