|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हजारो मुलींच्या उपस्थितीत ‘पणती’चा अविष्कार

हजारो मुलींच्या उपस्थितीत ‘पणती’चा अविष्कार 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

इचलकरंजी नगरपालिका व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘मीच माझ्या पणतीचा प्रकाश’ या कार्यक्रमास हजारो मुलींचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. यावेळी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्षा सौ. सरीता आवळे, महिला बालकल्याण सभापती जुलेखा पटेकरी यांच्यासह रोटरी पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.

‘मीच माझ्या पणतीचा प्रकाश आहे, नका विझवू ती पणती’ या स्त्राrत्वाचा स्वाभिमान व तीचा सन्मान करण्यासाठी इचलकरंजी नगरपालिका, रोटरी क्लब, युथ वेलफेअर फौंडेशन व वंदे फौंडेशन यांच्यावतीने राजाराम मैदानावर शनिवारी कार्यक्रम पार पडला. यामध्ये हजारो मुलींनी एकाच वेळी पणत्या बनवण्याचा आविष्कार केला. यामध्ये शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या मुलींनी उस्त्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

प्रत्येक महिन्यात येणाऱया चार दिवसांचा काळ हा अंधार आहे असे समजणाऱया मुलींच्या प्रगतीची वाटचाल प्रकाशाच्या दिशेने व्हावी याविषयावरील एका गाण्याचे दहा हजार मुलींनी एकत्रित सादरीकरण केले.  धीरज कनुगा  यांना गीतलेखन केले होते तर सरस्वती हायस्कूलचे संगीत शिक्षक कुलकर्णी संगीत दिले होते. यावेळी एक पथनाटय़ही सादर करण्यात आले.       

या कार्यक्रमास नगरसेवक युवराज माळी, कामगार अधिकारी विजय राजापुरे, रमा पाटील, राजश्री कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, राजाराम काळगे यांच्यासह अनेक संस्था व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: