|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सरपंच कोण? आज फैसला

सरपंच कोण? आज फैसला 

जिल्हय़ातील 17 ग्रामपंचायतीचा आज ठरणार सरपंच

प्रतिनिधी/ सातारा

राज्याच्या निवडणूक आयोगाने जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिह्यातील 38 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून बुधवारी मतमोजणीची प्रक्रिया होत आहे. जिल्हय़ात 17 ठिकाणी सरपंचपदासाठी तर 776 सदस्यपदासाठी निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी याची खबरदारी निवडणूक प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, सरपंच कोण होणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

जिह्यात मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायत मतदानाच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली होती. बुधवारी तालुक्याच्या ऑफिसला तसेच सातारा तालुक्यातील भुविकास बँक सभागृह येथे मतमोजणी सकाळी 10 वाजता होणार आहे. जिह्यातील 11 तालुक्यामध्ये 77 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. यापैकी 36 ग्रामपंचायतीतील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. 38 ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी मतदान जिल्हय़ात होत आहे. पोटनिवडणुकीमध्ये 424 ग्रामपंचायती होत्या. 17 ठिकाणी सरपंचपदासाठी तर 776 सदस्य पदासाठी निवडणूक होणार होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 100 कर्मचाऱयांना प्र†िशक्षण देण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी बुधवारी भूविकास बँकेच्या सभागृहात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, सातारा तालुक्यात 59.3 टक्के मतदान झाले असून धावडशी-80.2, लुमणेखोल-82.3, सासपडे-79, खिंडवाडी- 46, संभाजीनगर-65,  विलासपूर-60, शेळकेवाडी- 84, खेड-51 टक्के, फत्यापूर-83, कोंडवे-75 टक्के मतदान झाले.

Related posts: