|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » उद्यापासून दहावीची परीक्षा

उद्यापासून दहावीची परीक्षा 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्यभरात उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. पुणे,नागपूर, औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी त्यावर बारकोड असणार आहेत. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा. मात्र यावषीपासून पुरवणीवरही बारकोड असणार आहे.