|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या महाद्वार रोड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या महाद्वार रोड शाखेचा वर्धापनदिन उत्साहात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या महाद्वाररोड शाखेचा 19 वा वर्धापनदिन उत्साहात झाला. जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष प्रविण आमृतलाल मणियार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.

शाखा चेअरमन अभिजित मणियार यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. देशातील सद्याच्या आर्थिक मंदीवर मात करून योग्य नियोजनाद्वारे संस्थेच्या ग्राहकांना कोणतीही अडचण निर्माण झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहूण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाखाधिकारी माधुरी खोत यांनी आभार मानले. यावेळी संचालक अरुण मणियार, व्हाईस चेअरमन सुमित चौगुले, सुजय होसमनी, बाजीराव रावण, जनरल मॅनेजर एम.एस.पाटील यांची उपस्थिती होती.

Related posts: