|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूंदवाड पोलीस कर्मचाऱयांचा सत्कार

कुरूंदवाड पोलीस कर्मचाऱयांचा सत्कार 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

कुरूंदवाड येथे नुकतीच शिवराज यात्रा पार पडली. या यात्रेत परिसरातील 26 गावातील अबालवृद्ध, तरूण, महिला या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या गर्दीमुळे होणारा गोंधळ, ट्रफिकजॅम यासाठी येथील पोलीस कार्यरत असतात. यावेळी यात्रा विना ट्रफिकजॅम व निविघ्नपणे पार पडण्यासाठी कुरूंदवाड पोलिसांनी आपले कर्तव्याचे योगदान दिले. याचे सामाजिक भान ठेवून करंदीकर पॅटरर्स पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते गुरू करंदीकर यांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांच्या सत्कार केला.

कुरूंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले, आम्ही कर्तव्य पार पाडत असतो. येथील यात्रा ही प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे आठ दिवस मोठी गर्दी होते, पण आमच्या सर्व स्टाफ ने यात्रेत आनंद लुटणाऱयांना कोणताही अडथळा होवू नये, याची काळजी घेत आपले काम पार पाडले. पण आम्ही केलेल्या कामाची दखल समाजात कुणीतरी आहे, हे पहिल्यावर आम्हालाही काम करायला नवी उर्जा मिळते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार, सर्व पोलीस कर्मचारी, करंदीकर पॅटरर्सचे गुरू करंदीकर, ओम करंदीकर, शुभम आपटे, चेतन चौगुले, चेतन माळी आदी उपस्थित होते.