|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संदिप पाटील यांची तडीपारीत ‘नॉटआऊट’ सेंच्युरी

संदिप पाटील यांची तडीपारीत ‘नॉटआऊट’ सेंच्युरी 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात अनेक एस.पी आले अन गेले. प्रत्येकाकडे काम करण्याची पध्दत अलग होती. प्रत्येकाने आपआपल्या परीने आपल्या कामाचा ठसा जिल्हयावर उमटवण्याचा प्रयत्न केला.परंतु एस.पी.संदिप पाटील यांनी ज्या पध्दतीने जिल्हयातील गुन्हेगारीला हादरा दिला असा हदरा आतापर्यंत कोणत्याच एस.पी.नी दिला नव्हता. जिल्हयातील 26 टोळयातील 110 जणांवर तडीपारीची कारवाई करून जणुकाही तडीपारीची सेंच्युरीच पुर्ण केली आहे. तसेच जिल्हयातील सावकारी संपावताना मोक्क्याची कारवाईही जोरदारपणे केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य सातारकर या सेंच्युरीवर बेहदा खुष आहेत.

सातारा जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व लोकांच्या मनामध्ये सुर†िक्षततेची भावना निर्माण व्हावी याकरिता विद्यमान स्विकारताच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱयांना बेकायदा सावकारी करणारे, बेकायदा दारूविक्री, मटका-जुगार चालविणारे, महिलांच्या गळयातील दगिने हिसकावुन चोरणारे, मारामारी करणारे, खुन, दरोडा, जबरी चोरी करणारे, घरफोडी करणारे, समाजात भिती व दहशत निर्माण करणारे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या.

त्यानुसार जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी आपआपल्या पोलीस ठाण्याच्या हाद्यीतील बेकायदेशीर कृत्य करणाऱया लोकांच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये जिल्हयातील एकुण 62 टोळयावर तडीपारीचा प्रस्ताव हद्यपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्याकडे पाठवले होते. 62 प्रस्तावात एकुण 256 जणांचा समावेश होता. याबाबतची सर्व तपासणी संबंधित अधिकाऱयांकडून करून घेतल्यावर ज्यांना सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही व सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत असल्यास 26 टोळयातील 110 लोकांना जिल्हयातुन तडीपार केले.

तडीपार केलेल्यांमध्ये प्रामुख्याने पवनचक्की, कॉपर वायर चोरी मधील मराठवाडी पाटणचे नानासो पांडुरंग मोरे व अन्य पाच व सातारा तालुक्यातील कोंडिबा वसंत शिर्के व अन्य 4 यांचा टोळीचा समावेश आहे. तसेच कासपठारावर, हायवेवर जोडप्यांना गाठून लुटणारे गणेश जगन्नाथ तांदळे वगैरे 3 व ऐक्सप्रेस झोपडपटटी मधील कैलास नथु गायकवाड व अन्य 2 या टोळींचा समावेश आहे. तसेच शाहूपुरी सातारा शहर, सातारा तालुका, कराड शहर, मेढा, पाटण, वडूज, दहिवडी मधील मटका जुगार चालवणारे मनोज मिठापुरे व अन्य एक जण, जब्बर जमाल पठाण व दोन जण, प्रविण वाघमारे वगैरे एक, विद्याद्यर भोसले वगैरे एक, जयवंत बजरंग जाधव वगैरे दोन, मंगेश हिंदुराव देवकांत वगैरे 2 सुहास नारायण रणपिसे वगैरे एक, अलताफ राजेखान पठाण वगैरे 13 उमेर अलताफ मुजावर वगैरे 21 अशा जिल्हयातील मठका जुगार चालविणाऱया 11 टोळयांमधील 60 लोकांना तडीपार केले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱयांच्या विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीमधील 3 टोळयांमधील 13 लोकांना सुध्दा हद्यपारीचे आदेश झाले आहेत. अशाप्रकारे जिल्हयातुन आतापर्यंत 110 लोकांना तडीपार करून एस.पी.संदिप पाटील यांनी तडीपारीत सेंच्युरी मारली आहे.

तसेच 9 टोळयांमधील 42 लोकांना त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांचे वय, शिक्षण, आजारपण विचारात घेवून त्यांचा चांगल्या वर्तणुकीचा बॉंड लिहुन घेवून सुधारण्याची संधी दिली आहे. जिल्हातील अशा प्रकारे कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे. तसेच समाजामध्ये दहशत पसरवणाऱया बेकायदेशीर कारवाया करणाऱया 27 टोळयांमधील 104 लोकांची सुनावणी सुरू आहे.

चौकट- पान 1 लाच घेणे

तडीपारी म्हटले की……फक्त संदिप पाटीलच

साताऱयात आजपर्यंत अनेक एस.पी.नी आपआपल्या परीने ठसा उमटवला. स्वर्गीय अशोक कामटे यांचा डॅशिंगपणा, रामराव पवारांनी सेक्स स्पॅण्डल उजेडात आणुन हादरा दिला होता. चंद्रकांत कुंभार, प्रकाश मुन्याळ, विठठल जाधव यांची प्रशासनावरील उत्तम पकड, डॉ. अभिनव देशमुखांची वाहन तपासणीतुन गुन्हे उघड करण्याची पध्दत, सुरेश खोडपे यांचा सामाजिक पणा तर प्रसन्ना यांचा शिस्तपणा या सर्व अधिकाऱयांनी आपआपल्या परीने जिल्हयावर ठसा उमटवला तर स्वरूपसिंग धट व प्रशांत बुरडे यांचा सेवाकाळ वादग्रस्त ठरला. आता येथून पुढे तडीपारी म्हटले की फक्त अन फक्त संदीप पाटील असेच नाव निघणार हे त्रिवार सत्य.