|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » …तर ‘शिवसेना’ येथे रायगड उभारल्या शिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

…तर ‘शिवसेना’ येथे रायगड उभारल्या शिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हात एकटे उभे करून ठेवले आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा, शिवसेना येथे रायगड उभारल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळय़ासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एका बाजूला महाराजांच्या समाधीचा भव्य असा सेट तयार करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी, शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली आहे. गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त इथे शिवजयंतीसाठी येतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हात उभे करून ठेवले आहे. मात्र, आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते कृत्य सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितले. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्मयावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसे सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवजयंती केवळ शिवजन्मापुरती मर्यादित नाही. आपण शिवरायांना दैवत का मानतो, शिवरायांना साजेसा सण साजरा करणारा मर्द शिवसैनिक आजही जिवंत आहे, याचा आनंद, अभिमान आहे. अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.

 

Related posts: